File Image

मुंबई मध्ये आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसासोबत आता अपघातांचं देखील सत्र सुरू झाले आहे. मुंबईत आज पहाटेपासून पाऊस सुरू आहे अशा मध्ये चेंबूर (Chembur) भागात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दरड कोसळून काही भाग घरावर पडल्याने दोन भाऊ जखमी झाले आहेत. यामध्ये जखमींची वयं 20, 25 वर्ष आहेत.

चेंबूरच्या न्यू भारत नगर मध्ये ही दुर्घटना घडली आहे. पहाटे हे दोघेही घरात झोपलेले असताना हा प्रकार घडला आहे अशी माहिती फायर ऑफिशिएल्सने दिली आहे. दोन्ही जखमींना मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून जीवावरील धोका टळला आहे. एकाला उपचारानंतर डिस्चार्ज देखील करण्यात आले आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Weather Forecast: कोकण, विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा .

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांना जागा रिकाम्या करण्यास सांगितलं असल्याचेही स्पष्ट केले आहे. मुंबईकरांना अजून दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. आज रविवार आणि सुट्टीचा वार असल्याने अनेकजण पावसाचा आनंद घेताना दिसले. मात्र मुंबईकरांची आज या रिमझिम पावसामुळे उकाड्यापासून थोडी सुटका झाली आहे.