Maharashtra MLC Election 2020 Results: तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने विजय; एकटे लढण्याची हिंमत नाही, चंद्रकांत पाटील यांचा महाविकासआघाडीला टोला
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत (Maharashtra MLC Election 2020 Results) महाविकासआघाडीने भाजपला टक्कर देत मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला. या पराभवाने भाजपला धक्का बसला असला तरीही हे तीन पक्ष एकत्रित लढल्याने हा विजय मिळाल्याची टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने हे स्वाभाविकच होते असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच माझे नेहमीच त्यांना एकटे लढून दाखवण्याचे आव्हान राहिले आहे. मात्र ते एकटे लढणार नाही, त्यांच्यात तेवढी हिंमत नाही असेही ते मिडियाशी बोलताना म्हणाले. धुळे-नंदुरबार वगळता नागपूर, पुणे, औरंगाबाद या तीनही जागांवर महाविकासआघाडीने विजय मिळवला. त्यामुळे हा भाजपला जोरदार झटका होता.

या महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या निवडणूकीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला मात्र शिवसेनेला भोपळा मिळाला असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावलाय. तसेच या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा नजर टाकत आम्ही चिंतन, मनन, परीक्षण, कार्यवाही सगळं करु. आता आम्हालाच ताकद वाढवावी लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.हेदेखील वाचा- Maharashtra MLC Election Result: शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या निकालावर शरद पवार, चंद्रकांत पाटील ते अनिल देशमुख यांची पहा प्रतिक्रिया काय

दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनीही महाविकासआघाडीवर सडकून टिका केली आहे. तीन पक्ष एकत्र येऊन दोन तीन सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांबाबत अपशब्द वापरत एक ट्विट केले आहे.

महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा चुरशीच्या झालेल्या लढाईमध्ये महाविकास आघाडीने सरशी मारली आहे. 5 पैकी 4 जागांवर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी ठरले.