Abhijit Bichukale | (Photo Credits: Facebook)

लढविण्याचा अट्टाहास न सोडणारे Bigg Boss Marathi फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी आता पुन्हा एकदा नव्याने निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी राष्ट्रपतीपद, लोकसभा आणि विधानसभा अशा एक नव्हे तर अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा 'अण्णू गोगट्या' झाला आहे. तरीही ते आपला निवडणूक लढविण्याचा छंद नेहमीच जोपासताना दिसतात. आता त्यांनी पुणे पदवीधर मतदार संघातून (Pune Graduate Constituency) निवडणूक (Graduate Constituency Election 2020) लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता तरी त्यांना यश मिळणार का? याबाबत त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यांनी आपला निवडणूक अर्जही दाखल केल्याचे समजते आहे.

बिग बॉस मराठी 2 पर्वामध्ये अभिजित बिचुकले हे अधिक चर्चेत आले. बिग बॉसच्या घरात त्यांनी उडवलेले हस्स्याचे बार असो... घातलेला गोंधल असो.. त्याची खास डायलॉगबाजी असो की बिग बॉसच्या सेटवर त्यांना झालेली अटक असो. बिचुकले यांची स्टाईल हटके राहिली आणि ते सतत चर्चेत राहिले. राजकारण, कला, साहित्य अशा विविध क्षेत्रातमुशाफीरी करणाऱ्या अभिजित बिचुकले यांना पदवीधर मतदार तरी सहकार्य करणार का, हे पाहावे लागणार आहे. (हेही वाचा, शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी अभिजीत बिचुकले यांच्यावर गुन्हा दाखल)

दरम्यान, अभिजीत बिचुकले यांनी मतदारांना अवाहन केले आहे. आपल्या अवाहनात ते म्हणतात की, अनेक निवडणुकांमध्ये माझा पराभव झाला. होय, हे खरे आहे. परंतू, माझा पराभव का होतो याचे उत्तर जनतेने द्यायला हवे. पैसा आणि सत्ता यापुढे माझी चिकाटी नेहमीच कमी पडत आली आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पदवीधर मतदारांनी तरी आता माझ्या उमेदवारीचा गांभीर्याने विचार करत मला निवडून द्यावे, असे बिचुकले यांनी म्हटले आहे. आपण निवडून आल्यास नोकरी, बेकारी आणि तरुणांचे प्रश्न याकडे मी गांभीर्याने लक्ष देऊन असेही बिचुकले यांनी म्हटले आहे. टीव्ही 9 ने याबबत वृत्त दिले आहे.