शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी अभिजीत बिचुकले यांच्यावर गुन्हा दाखल
Abhijit Bichukale (Photo Credits: Facebook/ Abhijit Bichukale)

बिग बॉस मराठी 2 मध्ये चर्चेचा विषय ठरलेले कविमनाचे अभिजीत बिचकुले (Abhijit Bichukale) हे या शो नंतरही बरेच चर्चेत आहे. त्यात अभिजित बिचुकले साताऱ्यातील जावळी विधानसभा आणि मुंबईतील वरळी विधानसभा या दोन ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. बिग बॉस मराठी 2 शो पासून वादग्रस्त ठरलेले अभिजीत बिचुकले यांच्या आक्षेपार्ह कृत्यामुळे सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Maharashtra Assembly Election 2019: अभिजित बिचुकले यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी तीनपट श्रीमंत; पहा किती आहे बिचुकले दांपत्याची एकूण संपत्ती

21 ऑक्टोबर रोजी साता-यातील शिर्के शाळा मतदान केंद्रावर बिचुकले सहकुटूंब मतदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी होमगार्डने त्यांना काही कारणास्तव रोखल्याने बिचुकलेंचा राग अनावर झाला. आणि त्यांनी त्या होमगार्डला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी संबंधित होमगार्डने सातारा शहर पोलिस ठाण्यात बिचुकलेंविरोधात तक्रार दिली होती.

त्याचसंदर्भात बिचुकलेंवर 22 ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच "माझ्याविरोधात हे राजकीय षडयंत्र आहे" असा दावा बिचुकलेंनी केला असून होमगार्डची देखील तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

अलीकडेच त्यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या दैनंदिन प्रचाराचा हिशोब आयोगाला न दिल्याने त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली होती. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत वरळी विधानसभा मतदारसंघात (Worli Vidhan Sabha Constituency) अभिजीत बिचुकले यांच्यासोबत विश्राम तिडा पाडम आणि महेश पोपट खांडेकर या उमेदवारांनाही निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.