महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल: रायगड लोकसभा मतदारसंघातून NCP चे सुनील तटकरे विजयी; अनंत गीते पराभूत
Sunil Tatkare VS Anant Geete (Photo Credits: File Photo)

बारामतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विजयानंतर सुनील तटकरे विजयी ठरले आहेत. 2014 सालच्या पराभवाचा वचपा घेत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या अनंत गीते (Anant Gite) यांच्यावर त्यांनी मात केली आहे. यंदा देशासह महाराष्ट्रामध्ये एनडीएच्या बाजूने कौल दिला जाणार आहे. असे एक्झिट पोलच्या बरोबरीने सुरूवातीच्या कलांमधून समोर आले आहे.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

 

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये देशात 542 जागांवर मतदान झाले आहे. तर महाराषष्ट्रात 48 जागांवर मतदान झाले आहे. सध्या कल हातामध्ये आले आहेत. पुढील काही तासातच निकाल स्पष्ट होणार आहेत.