कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा (Lock Down) आजचा 14 वा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनानुसार देशातील सर्व राज्ये ही 14 एप्रिल पर्यंत अधिकृत रित्या लॉक डाऊन असणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील सद्य घडीची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात 15 एप्रिल रोजी संपूर्ण लॉक डाऊन उठवण्यात येईल असा विचार कोणीही करू नये असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले आहे. राजेश टोपे यांनी काल, नागरिकांना याबाबत सूचित केले आहे, त्यामुळे महाराष्ट्रात लॉक डाऊन (Maharashtra Lock Down) वाढणार हे आता जवळपास निश्चितच आहे. हे देखील वाचा- Coronavirus: भारतात गेल्या 24 तासात 704 नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आकडा 4281 वर पोहचला
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, ”जगातच कोरोनाची साथ आलेली आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला , तसेच लॉकडाउन शिथिल कसा करायचा यासंदर्भात सुद्धा काही गोष्टी ठरवण्यात आल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार अभ्यास करून राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना पाठवत असते. त्यानुसार राज्य सरकार काम करत आहे. त्यामुळे 10 आणि 15 एप्रिलच्या दरम्यानची परिस्थिती बारकाईनं अभ्यासुन मगच लॉक डाऊन काढण्याच्या बाबत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्र सरकारचे सल्लागार घेतील. त्यामुळे 15 एप्रिल रोजी संपूर्ण लॉकडाउन उठेल, असं कुणीही डोक्यात ठेवू नये. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे अशा मुंबई-पुणे सारख्या भागात काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे लॉकडाउन 15 एप्रिलनंतर शंभर टक्के शिथिल होईल , हे कोणीही गृहित धरू नये."
दरम्यान यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लॉक डाऊन च्या बाबत महत्वाची माहिती देताना सर्व परिस्थिती 14 एप्रिल पर्यंत आटोक्यात आल्यास लॉक डाऊन हटवायला काहीच हरकत नाही पण असे होणे हे देखील जनतेच्या हातात आहे असे म्हंटले होते. जनतेने लॉक डाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास लॉक डाऊन संपेल अन्यथा चालूच राहील असा इशाराही ठाकरे यांनी दिला होता. Coronavirus: महाराष्ट्रात लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1410 जणांना अटक तर 65 लाखाहून अधिक दंड वसूल
दुसरीकडे खरोखरच महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक हा भीषण स्वरूपात दिसून येत आहे. ताज्या आडेवारीनुसार राज्यात सध्या 868 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (526) असून त्यापाठोपाठ पुणे (141) आणि ठाणे (85) अशी रुग्णांची संख्या आहे.