Shashikant Shinde,Amol Mitkari | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी अमोल मिटकरी (Amol Mitkari), शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा आणि अकोला जिल्ह्याला संधी दिली आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एकूण 9 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने 4, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन जाणांना उमेदवारी दिली आहे. काग्रेस पक्षाने एक उमेदवार द्यावा अशी मित्रपक्षांची अपेक्षा असताना काँग्रेसने दोन उमदेवार उतरवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने या दोन व्यक्तिमत्वांनाच का उमेदवारी दिली याबद्दल.

अमोल मिटकरी

अमोल मिटकरी यांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला आहे. अमोलला आमदार करणार असा जाहीर शब्द अजित पवार यांनी दिला होता. अमोल मिटकरी यांची कामगिरीही तशीच आहे. मिटकरी यांची भाषणे आणि भाषणशैली अत्यंत आक्रमक असते. पण, त्यात एक गावरान बाजही असतो. त्यांच्या भाषणावर प्रेम करणारा खास असा एक वर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. अशा अमोल मिटकरी यांच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला अल्पसा प्रकाश.

अमोल मिटकरी यांनी सामाजिक कामाची कामाची सुरुवा गुरुदेव सेवा मंडळापासून केली. गुरुदेव सेवा मंडळ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केले आहे. पुढे त्यांनी संभाजी ब्रिगेड सोबत काम सुरु केले. संभाजी ब्रिगेडने त्यांना राज्यभर व्यसापीठ मिळवून दिले. त्यातून ते जनतेमध्ये लोकप्रिय होत गेले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अमोल मिटकरी यांच्या भाषणांची महत्त्वाची साथ राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत मिळाली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाण्याच्या काळात अमोल मिटकरी आणि आताचे विध्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीची मोठी साथ दिली. अमोल मिटकरी हे भाजप आणि देवेंद्र फडणडविस यांच्यावर घणाघाती टीका करतात. त्यांच्यी भाषा अश्लाघ्य नसते. विनोद, उपहास आणि वास्तवता यांचे बेमालूम मिश्रण त्यांच्या भाषणात असते. या सर्व गोष्टींमुळेच राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली असवी. (हेही वाचा, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस तर राजेश राठोड, राजकिशोर उर्फ पापा मोदी काँग्रेसतर्फे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात)

शशिकांत शिंदे

शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातील जावळी व कोरोगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शिंदे यांचा पराभव झाला. विधान परिषदेच्या निमित्ताने शिंदे यांचे राष्ट्रवादीने पुनर्वसन केले. दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे यांचा जनसंपर्क मोठा आहे. खास करुन पश्चिम महराष्ट्र आणि माथाडी कामगारांमध्ये. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते मानले जातात. त्यांच्या आमदारकीचा पक्षाला चांगला फायदा होईल, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आहे.

दरम्यान, शिवसनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषद उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने मात्र दोन उमेदवार रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार काँग्रेसने राजेश राठोड आणि बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना उमेदवारी दिली आहे.