
लॉकडाउननंतर (Lockdown) जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्ली कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना झपाट्याने पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट नव्हेतर, त्सुनामीच येणार, अशी भिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्ती केली होती. यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, कोरोना रुग्णांचा ग्रोथ रेट महाराष्ट्रात कमी आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्र सेफ झोनमधे आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
दिवाळीच्या काळात कमी झालेली कोरोना चाचणीची संख्या पुन्हा एकदा वाढवण्यात येणार आहे. राज्यात मध्यंतरी एका दिवसाला आरटीपीसीआर आणि अँटीजन, अशा दोन्ही मिळून साधरण 90 चाचण्या केल्या जात होत्या. मात्र, दिवाळीच्या काळात कोरोना चाचण्यांची संख्या 60 हजारवर गेली होती. परंतु, यात वाढ करून ही संख्या पुन्हा 90 हजारपर्यंत नेली जाणार आहे. उद्यापासून या सर्वांच्या वेगाने चाचण्या सुरु होतील. यासंदर्भातील अधिसूचना तातडीने काढण्याचे आदेश आपण दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- Lockdown Again in Maharashtra? महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार? राजेश टोपे, अनिल परब, विजय वडेट्टीवार यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 439 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 30 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 89 हजार 800 वर पोहचली आहे. यापैकी 16 लाख 58 हजार 879 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 46 हजार 683 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 92.69 तर, मृत्यूदर 2.61 टक्क्यावर पोहचला आहे. तसेच राज्यात आजपर्यंत 1 कोटी 3 लाख 66 हजार 579 प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.