महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या एचएससी (HSC) म्हणजेच बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले आहे. आता मंडळाकडून बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणार्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी आता मुदतवाढ करण्यात आली आहे. विद्यार्थी/ उमेदवार आता 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करू शकतात. Maharashtra HSC Board 2020 Exam: यंदा 12 वीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी mahahsscboard.in वर ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन सुरू .
विद्यार्थ्यांना, अर्ज दाखल करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता यामुळे ज्यांना वेळेत बारावी परीक्षेसाठी अर्ज करता आला नाही त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ज्युनियर कॉलेजमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांमधील नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी 'सरल डेटाबेस' वरून नियमित शुल्कासह 23 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन आर्ज दाखल कराण्यासाठी वेळ देण्यात आली होती. मात्र आता त्याला शिक्षण मंडळाकडून 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच परीक्षार्थी विलंब शुल्कासह 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत त्यांचा अर्ज दाखल करू शकतात. 12 वी परीक्षा वेळापत्रक 2020: बारावीचे संपुर्ण वेळापत्रक, बारावीचे व्होकेशनल परीक्षेचे संपुर्ण वेळापत्रक इथे पहा.
यंदा शिक्षण मंडळाने परीक्षा आणि गुण पद्धतीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता बारावीची परीक्षा 600 गुणांची होणार आहे. तर 25% वस्तुनिष्ठ प्रश्न असतील.