Representational Image (Photo Credits: Pixabay)

HSC Exam 2020 Form Online Registration: महाराष्ट्र स्टेट बोर्ड (MSBSHSE) कडून घेण्यात येणार्‍या 12 वीच्या परीक्षांसाठी आज (3 ऑक्टोबर) पासून ऑनलाईन स्वरूपातील रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. यंदा फेब्रुवारी - मार्च महिन्यात होणार्‍या परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर सुरू करण्यात आले आहे. पुढील 20 दिवसांमध्ये यंदा बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपातून रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

आजपासून सुरू करण्यात आलेल्या HSC परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सोय सुरू करण्यात आली आहे. व्होकेशनल विषयांचे विद्यार्थी त्यांचे फॉर्म 24 यंदा 31 ऑक्टोबरपर्यंत भरू शकणार आहेत. येथे पहा शिक्षण मंडळाचे नोटिफिकेशन  

Maharashtra Board 2020 परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं वेळापत्रक

ऑनलाईन फॉर्म कुठे भराल? - mahahsscboard.in

फॉर्म भरण्याचा कालावधी - 3 ते 23 ऑक्टोबर 2019

व्होकेशनल विषयांसाठी फॉर्म भरण्याचा कालावधी - 3 ते 31 ऑक्टोबर 2019

रजिस्ट्रेशन फी भरण्याचा कालावधी - 1 ते 18 नोव्हेंबर

Maharashtra Board 2020 चे फॉर्म कसे भराल?

आजपासून सुरू करण्यात आलेल्या HSC परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सोय सुरू करण्यात आली आहे. व्होकेशनल विषयांचे विद्यार्थी त्यांचे फॉर्म 24 यंदा 31 ऑक्टोबरपर्यंत भरू शकणार आहेत. अद्याप दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलेले नाही.त्याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.