Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde | | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra Guardian Ministers List:  राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी ही आज संध्याकाळी जाहीर करण्यात आली आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  म्हणजे पालकमंत्रिपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आले आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्र्‍यांकडे असून मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे. नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री पदी चंद्रशेखर बावनकुळे असतील (हेही वाचा -  AI Policy 2025 In Maharashtra: महाराष्ट्रात लवकरच एआय धोरण लागू करण्यात येणार; शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांच्या समितीची स्थापन)

पाहा पोस्ट -

आशिष शेलार यांच्याकडे मुंबईचे पालकमंत्री पद तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री असणार आहे. या यादीत मंत्री धनंजय मुंडे याच्या नावाचा समावेश नसल्याने सर्वांनीची आश्चर्य व्यक्त केले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही आहे. तर नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे.