AI Policy 2025 In Maharashtra: महाराष्ट्रात लवकरच एआय धोरण लागू करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यांसदर्भात शुक्रवारी माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने एआय धोरण 2025 वर शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. याबाबत माहिती देताना आशिष शेलार यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझ्या आयटी मंत्रालयाने एआय पॉलिसी टास्कफोर्सची स्थापना जाहीर करताना आनंद होत आहे, ज्यामुळे एआय आधारित उद्योगाच्या जलद वाढीचा फायदा घेण्यासाठी एआय धोरण 2025 विकसित करण्यास महाराष्ट्राला मदत होईल.

महाराष्ट्रात एआय पॉलिसी लागू होणार - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)