Mumbai Rain Update: कल्याण कंबा येथील रिसोर्ट आणि पेट्रोल पंप जवळ अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रशासनाचे सैन्य, नौदलासह NDRF च्या जवानांना लेखी आवेदन
Representational Image (Photo Credits: IANS)

मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतुकीच्या खोळंब्यासह अनेक ठिकाणी पाणी साचले असून ठिकठिकाणी लोक अडकली आहेत. कल्याण मुरबाड रोडवरील रिव्हर विंड रिसोर्ट (River Winds Resort) मध्ये काही लोक अडकले असून त्यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे पोलिसांना मदतीचे आवाहन केले होते. कल्याण मुरबाड रोडवरील कंबा (Kamba) येथील मेरिडियन शाळेपुढे (Meridian School) हे रिसोर्ट आहे. (मुसळधार पावसामुळे कल्याणच्या River Winds Resort मध्ये 50 लोक अडकले; मुख्यमंत्र्यांसह, ठाणे पोलिसांकडे मदतीचे आवाहन)

त्याचबरोबर कंबा पेट्रोल पंपजवळ 70 लोक अडकल्याची माहिती समोर येत आहे. यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने NDRF, हवाईदल, नौदल आणि सैन्याला लेखी पत्र लिहीले आहे. यात कंबा येथील पेट्रोल पंप आणि रिसोर्ट मध्ये अडकलेल्या एकूण 115 लोकांची सुटका करण्यात यावी, असे म्हटले आहे. या पत्रात त्यांनी संबंधित ठिकाणांचे Location-Co-ordinates नमूद केले आहेत. (मुंबई पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

ANI ट्विट:

काल रात्रीपासून बदलापूर ते वांगणी स्थानकामध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये तब्बल 700 प्रवासी अडकले होते. त्यातील आतापर्यंत 500 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यास NDRF च्या पथकाला यश आले आहे.