Monsoon Update (Photo Credits: Pixabay)

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई सह ठाणे, डोंबिवली, कल्याण या भागांना देखील बसला आहे. सातत्याने होणाऱ्या पावसामुळे रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूकीवर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसामुळे कल्याण मुरबाड रोडवरील रिव्हर विंड रिसोर्ट (River Winds Resort) मध्ये 50 लोक अडकले असून त्यांनी ट्विटरद्वारे मदतीचे आवाहन केले आहे. कल्याण मुरबाड रोडवरील कंबा (Kamba) येथील मेरिडियन शाळेपुढे (Meridian School) हे रिसोर्ट आहे. (मुंबईतील पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून आम्हाला मदतीची गरज असल्याचे ट्विटद्वारे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे पोलिस यांच्यासह कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी यांच्याकडे मदत मागितली आहे.

पहा ट्विट:

काल बदलापूर अंबरनाथ येथे देखील पावसामुळे रेल्वे प्रवासी अडकले होते. NDRF च्या पथकाने रात्रभर मदतकार्य करुन अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका केली.  काल रात्रीपासून  बदलापूर ते वांगणी स्थानकामध्ये रेल्वे ट्रकवर 2 फूट इतके पाणी साचल्याने कोल्हापूर -मुंबई  महालक्ष्मी एक्सप्रेसची वाहतूक ठप्प झाली असून त्यात तब्बल 11 तासंपासून  700 प्रवासी अडकले आहेत.