मार्च मध्ये देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) उद्रेक झाल्यानंतर देशात लॉक डाऊन (Lockdown) लागू करण्यात आला. गेले सहा महिने देशातील अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हळू हळू मिशन बिगेन अंतर्गत त्यामध्ये शिथिलताही आणली गेली मात्र अजूनही अनेक राज्यांमध्ये काही प्रमाणात आर्थिक दळणवळ थांबली आहे. सध्या महाराष्ट्र हे कोरोनाबाबत सर्वाधिक प्रादुर्भाव असलेले राज्य आहे. अशात आता राज्य सरकारने लॉक डाऊन 31 ऑक्टोबर पर्यंत वाढविले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबत माहिती दिली.
महत्वाचे म्हणजे अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने आता सरकारने रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
सीएमओ ट्वीट -
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.(1/2)#MissionBeginAgain pic.twitter.com/0DPy32X6se
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 30, 2020
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नवीन निर्देशांप्रमाणे -
- हॉटेल्स/फूड कोर्ट्स/रेस्टॉरंट्स आणि बार यांना प्रभावीपणे ऑपरेट करण्याची परवानगी दिली जाईल. 5 ऑक्टोबर, 2020 पासून 50% क्षमतेसह या गोष्टी सुरु होतील. पर्यटन विभागाकडून यासाठी स्वतंत्र एसओपी दिले जाईल
- मुंबईत महानगर प्रदेशातील अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची सर्व औद्योगिक व उत्पादन करणारी युनिट्स चालविण्यास परवानगी दिली जाईल.
- राज्यात आणि राज्याबाहेर ऑक्सिजन वाहून नेणारी वाहने आणि ऑक्सिजनवर कोणतेही बंधन असणार नाही.
- सध्याची रेल्वेची मागणी लक्षात घेता राज्यात रेल्वे सेवा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
- पोलिस आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या क्यूआर कोडच्या बेसीसवर, एमएमआर क्षेत्रातील डब्बावालांना स्थानिक गाड्यांमध्ये परवानगी देण्यात येईल
- एमएमआर क्षेत्रातील प्रोटोकॉल व कार्यपद्धतीनुसार पुणे विभागातील लोकल गाड्या पुन्हा सुरू केल्या जातील. यामध्ये पुणे पोलिस आयुक्त हे नोडल अधिकारी असतील.
- शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, थिएटर, कोचिंग क्लासेस, जलतरण तलाव, प्रेक्षागृह 31 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील.
- प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास (सरकारच्या परवानगीशिवाय) साठी परवानगी नसेल.
- राज्यातील मेट्रो सेवा बंद राहील
- सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा संबंधित, करमणुकीशी संबंधित, सांस्कृतिक आणि धार्मिक मेळाव्यास परवानगी नसेल. (हेही वाचा: आरे मधील Metro Car-Shed च्या बांधकामासाठी झाडे तोडण्यासंदर्भात आंदोलन केलेल्या लोकांवरील गुन्हे मागे घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गृह विभागाला निर्देशन)
यामध्ये सरकारने जिथे शक्य असेल तिचे वर्क फ्रॉम करण्याचा सल्ला दिला आहे. यासह राज्यात मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय रस्त्यावर थुंकणे व सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा आणि तंबाखू यांचे सेवन करण्यास मनाई असणार आहे. अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारने आता लॉक डाऊनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता आणली आहे. महत्वाचे म्हणजे सरकारने अजूनही मेट्रो, रेल्वे, जिम व मंदिरे यांच्याबाबत अजूनही काही निर्णय घेतला नाही. दुसरीकडे भारत सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल/मल्टिप्लेक्स/जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी दिली आहे.