मुंबई: आरे मधील Metro Car-Shed च्या बांधकामासाठी झाडे तोडण्यासंदर्भात आंदोलन केलेल्या लोकांवरील गुन्हे मागे घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गृह विभागाला निर्देशन
Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुंबईतील आरे कॉलनीती देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मेट्रो कार शेड तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कारशेड निर्माण करण्यावर बंदी घातली होती. तर या कारशेडसाठी हजारोंच्या संख्येने झाडे कापण्यात आली होती. या प्रकारामुळे वन्य प्रेमींनी याच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते.यामध्ये काही जणांना अटक करण्यासह चार्जशीट ही दाखल करण्यात आले होते. मात्र आता मेट्रो कार शेडच्या बांधकामासाठी झाडे तोडण्यासंदर्भात आंदोनल केलेल्या लोकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह विभागाला निर्देशन दिले आहेत.

गृह विभागाला आरे मेट्रो कार शेडसाठी आंदोलन केलेल्या लोकांच्या विरोधातील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.(Aarey Forest Case: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा)

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कारशेट दुसरीकडे हलवण्यात येणार असल्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. कारशेड दुसरीकडे नेण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र आता विरोधी पक्षाकडून आता ज्या जागेवर झाडे तोडण्यात आले आहेत त्या क्षेत्राचे काय होणार असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाच्या दृष्टीकोनाने या विशेष जागेवर वन संबंधित काम केले जावे असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नुसार, या जागेवर वाइल्ड लाइफ रिसर्ज अॅन्ड ट्रेनिंग सेंटर किंवा वाइल्ड लाइफ फॉरेंसिक लॅब तयार केली जाऊ शकते.

दरम्यान, आरे मधील वृक्षतोडीच्या निर्णयाला पाठिंबा देत  मुंबई उच्च न्यायालयाने आरे हे जंगल नाही असा निर्णय दिला होता, त्याच रात्री एकाएकी आरे मधील शेकडो झाडे कापण्यात आली होती. यानंतर आरे परिसरात अनेक पर्यावरण प्रेमींनी धाव घेत निषेध करत आंदोलने केल्याचे दिसून आले होते. या    परिस्थितीची तीव्रता पाहता मुंबई पोलिसांनी या भागात कलम 144 लागू केला होता. परिणामी आरे मध्ये एका वेळी चार हुन अधिक व्यक्तींना जमण्यास मनाई करण्यात आली होती. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 29 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती.