कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावावर उपाय म्हणून लादण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे महाराष्ट्रासहित अनेक राज्यांची अर्थचक्रे थांबली आहेत, यांना निदान किंचित गती मिळावी याकारणाने अनेक राज्यांनी काही दिवसांपूर्वी दारू विक्रीला (Liquor Sell) परवानगी दिली होती, पण या निर्णयाचा परिणाम असा झाला की दारूच्या दुकानांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागू लागल्या. अशावेळी सोशल डिस्टंसिंगच्या (Social Distancing) नियमांचा अक्षरशः धुव्वा उडाला. अनेकठिकाणी तर ही दारूची दुकाने बंद सुद्धा करण्यात आली, अर्थात यामुळे मद्यप्रेमींची मात्र निराशा झाली होती, पण आता या सर्व तळीरामांसाठी महाराष्ट्र सरकारने एक आनंदवार्ता दिली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई टोकन (E-Token) सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाईन शॉप बाहेर री गर्दी टाळण्यासाठी ही ई - टोकन सुविधा सुरु करण्याचा उपक्रम उत्पादन शुल्क विभाग राबवणार आहे. यासाठी ऑनलाईन बुकिंग कसे करायचे हे जाणून घ्या. Coronavirus Update In Maharashtra: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सहित तुमच्या जिल्ह्यात किती COVID19 रुग्ण?
दारू खरेदीसाठी कसे मिळवाल ई- टोकन?
- www.mahaexcise.com या वेबसाईटवर जा
- सर्वात आधी वेबसाईटवर ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव टाका
-त्यानंतर आपला जिल्हा व पिनकोड नमूद करा.
-सबमिट बटनवर क्लिक करा
- माहिती सबमिट केल्यानंतर त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या वाईन शॉपची यादी दिसेल. त्या दुकानांपैकी एका दुकानाची निवड करा.
-तारीख आणि वेळ निवडा.
- स्क्रीनवर ई - टोकन मिळेल. जे दाखवून आपल्या सोयीनुसार रजिस्टर केलेल्या दुकानात दारू खरेदी करता येईल.
दरम्यान, महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सुद्धा काल अशाच प्रकारचा निर्णय अंमलात आणण्याचा विचार सरकार करत असल्याचे सांगितले होते. दारूची ऑनलाईन डिलिव्हरी ही गर्दी टाळण्यासाठी उत्तम पर्यायी मार्ग ठरेल असे मलिक यांनी सुचवले होते. राज्यात अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने दारूची वाहतूक आणि विक्री केली जात आहे त्यास आळा घालून अशी सोया करून दिल्यास त्याचा सरकार व जनता ओद्घांनाही फायदा होईल असेही मलिक यांनी म्हंटले होते.