Uddhav Thackeray: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना महाराष्ट्र सरकार सहकार्य करणार- उद्धव ठाकरे
Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo: Facebook)

कोरोनामुळे (Coronavirus) दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत मदत केली जाणार असल्याची घोषणा केंद्रा सरकारने काल केली आहे. देशातील अनाथ मुलांना मोफत शिक्षण, मासिक भत्ता आणि दहा लाखांचा निधी देण्यात येणार आहे, अशी घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल केली आहे. याचपार्श्वभूमीवर  महाराष्ट्र सरकारदेखील (Maharashtra Government) कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सहकार्य करणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनाथ मुलांना सहकार्य करण्याचे म्हटले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल महिला व बालविका विभागाला कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदत करण्यासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनामुळे जवळपास 2 हजार 290 मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. या मुलांच्या गरजा विचारात घेऊन धोरण तयार केले जावे, असे उद्धव ठाकरे यांनी महिला व बालविकास विभागाची झालेल्या बैठकीत म्हणाले होते. हे देखील वाचा- Mumbai: हॉटेलमध्ये साध्या फ्रीजमध्ये कोरोना विषाणू लस Covaxin ची साठवणूक; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले चौकशीचे आदेश

उद्धव ठाकरे यांचे भाषण-

दरम्यान, केंद्र सरकारनेही कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. कोरोनमुळे ज्या मुलांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे, त्यांना 18 वर्षांच्या कालावधीसाठी 5 लाखांचा मोफत आरोग्य विमा देखील मिळेल. यासह, अशा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी मदत दिली जाईल आणि त्याचे व्याज पीएम केअर फंडाद्वारे वहन केले जाईल. महत्वाचे म्हणजे, ही मुले भारताचे भविष्य आहे. आम्ही त्यांचे संरक्षण आणि मदत करण्यासाठी सर्व काही करू. या मुलांची काळजी घेणे आणि उज्ज्वल भविष्याची आशा करणे, हे समाजातील नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.