महाराष्ट्राला चार दिवसात दारू विक्रीने मिळाला 150 कोटी रुपयांचा महसूल, राज्य उत्पादन शुक्ल विभागाची माहिती
Liquor Shop (Photo Credits: ANI)

लॉकडाउनमधील शिथिलता कमी करून महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सरकारने अन्य राज्यांप्रमाणे 4 मे पासून कंटेंट झोन वगळता मद्य दुकानांसह (Liquor Shops) स्टँडअलोन दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राला चार दिवसात दारू विक्रीने 150 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनमुळे सुमारे 40 दिवस दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत चार दिवसांत ही रक्कम गोळा करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पीटीआयमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, "उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सायंकाळपर्यंत दारू विक्रीतून सुमारे दीडशे कोटी रुपयांचा महसूल जमा केला. राज्यात 10,822 परवान्यावरील दारूची दुकाने असून त्यापैकी 3,261 पुन्हा उघडण्यात आल्या आहेत," असे अधिकाऱ्याने सांगितले. (Coronavirus: दिल्लीत दारूच्या किंमती वाढल्या; सरकारने MRP वर लावला 70 टक्के ज्यादा 'स्पेशल कोरोना फी' कर)

लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला असला तरी, राज्य सरकारने दिलेली सवलत म्हणून स्वतंत्र दारूची दुकानं ऑपरेट करण्याची परवानगी देण्यात आली होती. "बुधवारी सायंकाळपर्यंत राज्याला 100 कोटींपेक्षा जास्त महसूल मिळाला होता. त्यात आणखी 48.14 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, असे अधिकाऱ्याने म्हटले. गुरुवारीच अंदाजे 13.82 लाख लिटर बाटलीबंद भारतीय मेड मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल), बिअर, वाइन आणि देशी दारू विकली गेली, असे त्यांनी सांगितले. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यातील नियमांनुसार, हिरव्या, ऑरेंज आणि लाल (नॉन-कंटेन्टमेंट) झोनमधील स्टँडअलोन दारूची दुकाने संध्याकाळी 7 पर्यंत चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दारूच्या दुकानाबाहेर दारू खरेदी करण्यासाठी उत्साही लोकांची गर्दी जमू लागली होती. अशा स्थितीत सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. दुसरीकडे, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, "मुंबई, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांमधील सद्य विक्रीला सध्या कोविड-19 मुळे बंदी आहे, परंतु गेल्या एका दिवसात राज्यातील अन्य 18 जिल्ह्यांतील 2,967 दारू दुकानातून एकूण 12.50 लाख लिटर विविध प्रकारचे मद्य विकले गेले आहे."