अयोद्धेमध्ये महाराष्ट्र सदनासाठी जागा मागणार; उद्धव ठाकरे यूपीच्या मुख्यमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करणार असल्याची आदित्य ठाकरेंची माहिती
Aaditya Thackeray | PC: Twitter

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज चौथ्यांदा अयोद्धे दौर्‍यावर आले आहे.  आज संध्याकाळी रामलल्लांचे दर्शन, हनुमान गढीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तसेच शरयू नदीवर आरतीमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान तत्पूर्वी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अयोद्धेमध्ये महाराष्ट्र सदनासाठी जागा मागितली जाणार आहे असे सांगितले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) याबाबत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Aadityanath) यांंच्याशी बोलणं होईल. पत्रव्यवहार होईल अशी माहिती त्यांनी दिली आहेत. महाराष्ट्रातून अनेक भाविक अयोद्धा नगरीत भगवान श्रीरामांच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी एक सुसज्ज महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) असावं असे त्यांनी सांगितले आहे. अंदाजे 100 खोल्यांचं महाराष्ट्र भवन बांधण्याचा ठाकरेंचा मानस आहे.

दरम्यान भगवान श्रीरामांच्या दर्शनापूर्वी त्यांनी इस्कॉन मंदिर अयोद्धेला भेट दिली आहे. तेथे त्यांनी शिवसेना आमदार, खासदारांसोबत स्नेहभोजनाचाही आस्वाद घेतला. यापूर्वी 3 वेळा अयोद्धा दौरा केला आहे आणि प्रत्येकवेळी हा अनुभव चांगलाच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या अयोद्धा दौर्‍याला कोणत्याही अटी शर्थी नव्हत्या. हा दौरा राजकीय नसून आस्थेचा एक भाग म्हणून असल्याने येथे राजकारण आणू नये असे आवाहन त्यांनी यूपीमध्ये आल्यानंतर केले आहे.

आमची भक्ती हीच आमची शक्ती आहे, त्यामुळे आम्हाला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही. आमच्या हातून महाराष्ट्राची सेवा व्हावी यासाठी प्रभू रामाकडे साकडं घालण्यासाठी आल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले  आहे. आदित्य ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, नीलम गोर्‍हे आणि युवासेनेची मंडळी उपस्थित आहेत. Aaditya Thackeray Visit to Ayodhya: आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा, शिसेनेत जल्लोष; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम .

शिवसेनेच्या नाशिक, ठाणे, मुंबई जिल्ह्यातून कार्यकर्ते ट्रेन, फ्लाईट्स द्वारा अयोद्धेमध्ये दाखल झाले आहेत.