Aaditya Thackeray on Mumbai Local Resumption: कोविड19 लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी लोकल रेल्वे प्रवासाबाबत दोन दिवसांत निर्णयाचे मंत्री आदित्य ठाकरे यांंचे संकेत
Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

मुंबईकरांना कोविड 19 नियमांमधून शिथिलता मिळाली असली तरीही अद्याप मुंबई लोकल मधून प्रवासाची प्रतिक्षा कायम आहे. आज (6 ऑगस्ट) मुंबई भाजपा कडून याच आग्रही मागणी साठी आंदोलन करण्यात आले आहे. भाजपाच्या रेल भरो आंदोलन आणि मुंबईकरांना रेल्वेप्रवासाची मुभा कधी मिळणार? या गोष्टीवर मुंबई उपनगर चे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सूचक विधान केले आहे. सरकार मुंबई लोकल (Mumbai Local)  सर्वसामान्यांना खुली करण्याबाबत विचार करत आहे. येत्या 2 दिवसांत त्याबाबतचा निर्णय होऊ शकते असे संकेत त्यांनी मीडीयाशी बोलताना दिले आहेत. नक्की वाचा: BJP On Mumbai Local Resumption: मुंबई मध्ये भाजपा चं 'रेलभरो आंदोलन'; प्रविण दरेकर, अतुल भातखळकर रेल्वे प्रवासासाठी स्टेशन वर.

दरम्यान आदित्य ठाकरेंनी भाजपाच्या रेलभरो आंदोलनावर बोलताना,'हा राजकारणाचा मुद्दा नाही. जसं नागरिक समजून घेत आहेत तसेच राजकीय पक्षांनी देखील समजून घ्यावं. असे विरोधकांना सुनावलं आहे. कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रमाणेच इतर काही निर्बंधांमधून शिथिलता मिळू शकते का? याची देखील चाचपणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आदित्य ठाकरेंपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील मुंबई लोकल सुरू करण्याला सरकारचा विरोध नाही पण रेल्वे मंत्रालयाशी बोलून आणि अन्य बाबी चाचपून थोडा उशिराने निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंनीही आज मुंबई लोकल बाबत बोलताना 'जीव वाचवण्याकडे सरकारचं प्राधान्य असल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडे भाजपा, मनसे कडून कोविड 19 लस घेतलेल्यांना विमानप्रवासात मुभा मिळू शकते मग़ मुंबई रेल्वे प्रवासातच आडकाठी का केली जातेय? असा प्रश्न विचारला गेला आहे.