महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याचा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय- शरद पवार
NCP Chief Sharad Pawar (Photo: Facebook)

महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट संपून आज नवे सरकार स्थापन झाल्याचे पहायला मिळत आहे. सकाळीच राजभवनात  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व प्रकरणावर मोठा राजकीय भुकंप असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.

शरद पवार यांनी सत्ता स्थापनेची कोंडी फुटल्यानंतर असे म्हटले आहे की, भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय हा अजित पवार यांनी वैयक्तिक घेतला आहे. त्यामुळे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश नाही आहे. तसेच अजित पवार यांच्या निर्णयला आम्ही पाठिंबा देणार नाही. एवढेच नाही अजित पवार यांच्या निर्णयाला मान्यता दिली असल्याची नोंद सुद्धा आमच्याकडे नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.(मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्ता कोंडी फुटण्यावर स्पष्टीकरण)

शरद पवार ट्वीट: 

शुक्रवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामध्ये नव्या सरकारचा ब्लूप्रिंट सुद्धा तयार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमतीने शिक्कामोर्तब ही झाले. मात्र शनिवारी राजकरणात मोठा ट्वीस्ट पहायला मिळाला असून राष्ट्रवादीने भाजप सोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. तसेच भाजप सत्ता स्थापनेसाठी काहीही करु शकते असे ही संजय राऊत यांनी म्हटले आहे.