Devendra Fadnavis | Photo Credits: ANI

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. तर रातोरात भाजप आणि राष्ट्रवादी यांनी मिळून सत्ता स्थापनेची कोंडी फोडत राज्यात नवे सरकार आणले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्याचसोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची कमान स्विकारली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री पद स्विकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी रातोरात कशा पद्धतीने सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे यावर मोठे विधान केले आहे. या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री पदाची अधिकृतरित्या शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले आहे की, आम्हीला स्पष्टपणे जनादेश देण्यात आला होता. परंतु शिवसेनेने या जनादेशाचा आदर न करत आमच्यासोबत युती तोडली आणि दुसऱ्या पक्षांसोबत सत्ता स्थापनेचा वारंवार प्रयत्न केला. तसेच महाराष्ट्रात स्थिर आणि स्थाई सरकार हवे असे ही फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत मिळून काम करणार आहोत.(Maharashtra Government Formation Live Updates: अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नाही; शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया)

ANI Tweet: 

शुक्रवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामध्ये नव्या सरकारचा ब्लूप्रिंट सुद्धा तयार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमतीने शिक्कामोर्तब ही झाले. मात्र शनिवारी राजकरणात मोठा ट्वीस्ट पहायला मिळाला असून राष्ट्रवादीने भाजप सोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे. यावर आता काँग्रेस आणि शिवसेना काय भुमिका घेणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.