पक्षाचे सर्व आमदार उपस्थित नसताना केलेली जयंत पाटील यांची झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड ही अवैध आहे. तसेच, अजित पवार यांचे विधिमंडळ नेतेपदावरुन हटवणं हे अवौध असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात राज्यपालांना वरील मुद्द्यांना अनुसरुन आदेश द्यावेत अशी विनंतीही केली आहे. पण, या याचिकेवर न्यायालय उद्या 11.30 वाजता सुनावणी घेणार आहे.

वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीची बैठक संपली आहे. बैठकीनंतर सर्व आमदार हॉटेल रेनेसान्सकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास-नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीला 5 आमदार गैरहजर असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

 

अजित पवार यांच्यासोबत असणारे अनेक आमदार वाय.बी. सेंटमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना याठिकाणी आणल्याचे पाहायला मिळाले. संजय बनसोडे यांनी पवारांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. आता अजित पवार वगळता केवळ तीन अद्याप बैठकीला गैरहजर आहेत.   

राष्ट्रवादी पक्षाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यांच्या मुलाने पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे. मात्र दरोडा दिल्लीत जात असतानाचा फोटो व्हायरल झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. 

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची विधिमंडळपदी निवड झाली आहे. नुकतचं अजित पवार यांना विधिमंडळ पदावरून हटवण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अजित पवार यांची उचलबांगडी केल्यानंतर विधिमंडळ नेतेपदी दुसऱ्या नेत्याची निवड केली जाणार असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यापैकी एकाची विधिमंडळपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 

अजित पवार यांना विधिमंडळ पदावरून हटवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अजित पवार यांची उचलबांगडी केल्यानंतर विधिमंडळ नेतेपदी दुसऱ्या नेत्याची निवड केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यापैकी एकाची विधिमंडळपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आज राज्याबाहेर जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे. यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. काँग्रेस आमदारांना जयपूरला हलवणार असल्याचेही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची सांगितले आहे. 

शशीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांनी बेपत्ता आमदार संजय बनसोडे यांना वाय. बी. सेंटरमध्ये आणलं आहे. संजय बनसोडे सकाळपासून गायब होते. शशीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी  बनसोडे यांना विमानतळावरून आणलं आहे. 

काहीही कर, पण उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दे, असं भावनिक आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे अजित पवार यांना आवाहन  केलं आहे. सत्तेसाठी आपल्या कुटुंबात फुट नको, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला अजित पवार पाठिंबा देणार का? तसेच ते उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का? हे सर्व प्रश्न अद्याप कोड्यात आहेत. 

Load More

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षात अचानक सर्वात मोठे ट्विस्ट आल्याचे समजते, आज, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्याचे समजते. राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा शपथ विधी पार पडला. 24 तास पूर्वी पर्यंत महाविकासाआघाडीची सत्ता स्थापन होणार आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरु असताना आजचा हा अचानक पार पडलेला शपथविधी शिवसेनेला मोठा धक्का आहे. दुसरीकडे शपथविधी सोबतच राज्यातील राष्ट्रपती राजवट देखील रद्द करण्यात आली आहे.

ANI ट्विट

देवेंद्र फडणवीस यांनी शपथ विधी नंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिलेल्या माहिती नुसार,महाराष्ट्राला स्थायी सरकार मिळावे या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी पुढाकार घेऊन भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला. यासोबतच अन्य काही पक्षांनी देखील सोबत येणायचा निर्णय घेतला.असं असलं तरी अद्याप भाजपाला बहुमत सिद्ध करता आलेलं नाही राज्यपालांकडून यासाठी अवधी देण्यात येणार असून तत्पूर्वी राज्यात लवकर सत्ता स्थापन व्हावी यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले. यानंतर लवकरच बहुमत सिद्ध करून पाठोपाठ मंत्रिमंडळ विस्तार देखील करण्यात येईल असेही ते म्हणाले.

दरम्यान,फडणवीस यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे खापर शिवसेनेच्या माथी फोडले आहे. महायुती असतं सुद्धा सत्तास्थापनेसाठी इतर पक्षांकडे शिवसेना गेल्याने राज्यात ही परिस्थिती आली होती. मित्रपक्ष शिवसेनेला दिलेल्या आश्वासनाबाबत जरी वाद असले तरी सर्वात आधी राज्यातील जनतेला आम्ही वाचन दिले आहे आणि त्याच्या पूर्तीसाठी आज मी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.