Final Year Exams 2020: अव्यावसायिक, व्यावसायिक कोर्सच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा विचार, पंतप्रधानांना CM उद्धव ठाकरेंचे पत्र
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता राज्यात अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक आणि व्यावसायिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान काल (25 जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबाबतचं पत्र लिहून संबंधित केंद्रीय स्तरावरील सर्वोच्च यंत्रणांना त्याबाबत निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान AICTE, COA, PCI, BCI, NCTE & National Council For Hotel Management आणि Catering Technology यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत करून विद्यापीठांना गाईडलाईन्स जारी करण्याच्या सूचना देखील राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. आता युजीसी कडून दिलेल्या फॉर्म्युला नुसार पदवी दान केली जाणार आहे. Maharashtra University Final Year Exams 2020: कला, विज्ञान, वाणिज्य शाखेच्या अंतिम पदवी परीक्षा होणार नाही- उदय सामंत

महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षाच्या, अंतिम सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी राज्यात एमडी/ एम एस या वैद्य शास्त्रातील परीक्षा देखील डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्राला पत्र पाठवण्यात आलं आहे.

CMO ट्वीट

महाराष्ट्रात अजूनही नीट, सीईटी, आयआयटी सारख्या प्रवेश परीक्षांबाबत निर्णय झालेला नाही. दरम्यान आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाने त्यांच्या 10,12वीच्या बोर्डाच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये कळवला आहे. ICSE, CBSE 2020 Results Date: 10वी 12वी चे निकाल जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत लावण्याची तयारी; बोर्डाची सर्वोच्च न्यायालयात माहिती.

महाराष्ट्रामध्येही काल (25 जून) काल 24 तासांमध्ये सर्वाधिक रूग्णसंख्येमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. आरोग्य विभगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काल 24 तासांत 4 हजार 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 192 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 47 हजार 741 वर पोहचली आहे. यापैकी 6 हजार 931 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 77 हजार 453 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.