महाराष्ट्रावर कोरोना व्हायरसचे संकट टळले नसून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, कला, विज्ञान, वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली आहे. BA, BSC आणि Bcom अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा हितावह निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे. एटीकेटी संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी तसं लेखी विद्यापीठाला द्यायचं आहे. ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांनीही विद्यापीठाला लेखी द्यायचं आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पदवी प्रदान केली जाईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा कधी घ्यायची याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत असंही सामंत यांनी म्हटलं आहे. Final Year Exams: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विनापरिक्षा उत्तीर्ण करा; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची UGC ला विनंती
अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक आणि व्यावसायिक विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आज महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे ... बॅकलॉग च्या विध्यार्थ्यानी देखील काळजी करू नये तुमच्याही हिताचाच निर्णय होईल. pic.twitter.com/Ys8QmAfceK
— Uday Samant (@samant_uday) June 19, 2020
राज्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. मात्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी परीक्षा रद्द करता येणार नाहीत असं जाहीर केलं होतं. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. त्यात अंतिम वर्षाची परीक्षा ऐच्छिक असा निर्णय घेण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री फेसबुक लाइव्हद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देणार आली.