Mahashramadan 2019 (Photo Credits: Twitter)

Mahashramdan 2019 Of Paani Foundation: महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सरकारसोबतच नागरिक त्यांचं कर्तव्य म्हणून जलसंधारणासाठी मदत करत आहेत. अशामध्ये बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांचा देखील मोलाचा वाटा आहे. 2016 साली त्यांनी सुरू केलेल्या पाणी फाऊंडेशन सोबत ‘जलमित्र’ बनून मराठी कलाकारांनी देखील आज महाराष्ट्रभर महाश्रमदान उपक्रमामध्ये भाग घेतला. यामध्ये अमेय वाघ (Amey Wagh), स्पृहा जोशी (Spruha Joshi), मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) , सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आदी कलाकारांचा समावेश होता. Maharashtra Din 2019: 59 व्या महाराष्ट्र दिन निमित्त जाणून  घ्या  महाराष्ट्र राज्याबद्दल ‘5’ गौरवास्पद गोष्टी

महाश्रमदान 2019 मध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटी 

आमिर खान आणि किरण राव   

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आमिर खानने अनेक जलमित्रांच्या मदतीने श्रमदान केले.

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर

सोळशी गावात पानी foundation  सोबत अभिनेता अमेय वाघ याने काम केले.

स्पृहा जोशी

.नाशिक येथे.सिन्नर तालुक्यातील धोंडबार गावात अभिनेत्री स्पृहा जोशीने काम केले.

मिलिंद गुणाजी

मिलिंद  गुणाजीने पुण्यातील पुरंदर तालुक्यात काम केले.

जितेंद्र जोशी 

पुष्कर श्रोत्री

दुष्काळी भागात पानी फाउंडेशन काम करते. दुष्काळग्रस्त भागात गावकर्‍यांना  प्रशिक्षण देउन पाणलोट व्यवस्थापनाविषयी शिकलेली कौशल्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा म्हणून ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करते. पहिल्या वर्षी आम्ही 3 तालुके, दुसऱ्या वर्षी 30 तालुक्यांमध्ये, तिसऱ्या वर्षी 75 तालुक्यांमध्ये आणि यंदा चौथ्या वर्षी ही स्पर्धा तब्बल 76 तालुक्यांमध्ये ही चळवळ पोहचली आहे.