Kirit Somaiya On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही; किरीट सोमय्या यांची टीका
Kirit Somaiya (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. यावर धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिले आहे. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे. मात्र, याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. जो पर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तो पर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असे किरीट सोमय्या ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

महाराष्ट्राची अस्मिता कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे स्वतःच मान्य करतात त्यांच्या दोन पत्नी आहेत. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करतेय, त्यामुळे जो पर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तो पर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Dhananjay Munde's Facebook Post: धनंजय मुंडे यांनी बलात्काराचा आरोप फेटाळला; सोशल मीडिया अकाऊंटवर खुलाशासहीत स्पष्टीकरण

किरीट सोमय्या यांचे ट्विट-

धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. ज्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तुला जर गायिका बनायचे असले तर, मी बॉलीवूड मधील मोठ्या निर्मात्यांशी भेटून तुला लॉंच करीन असे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे या महिलेने म्हंटले आहे. तसेच पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्विट केले आहे.