Maharashtra: साधुसंताची कोरोनाची चाचणी करण्याची मागणी, लवकरच निर्णय जाहीर केला जाणार
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

Maharashtra:  राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा तुफान वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे वारंवार सांगण्यात येत आहे.त्याचसोबत सध्या लसीकरम मोहिमेला सुद्धा नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. अशातच आता राज्यातील साधुसंताची सुद्धा कोरोनाची चाचणी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. ही मागणी अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असे आरोग्यमंत्री राज्यमंत्र राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र ही साधुसंताची भुमी मानली जात असल्याचे महासंघातील यश प्रमोद यांनी म्हटले आहे. तर सध्याची कोरोनाची परिस्थितीत पाहता रुग्णांच्या संख्येत सुद्धा तुफान वाढ होत आहे. त्यामुळे साधुसंतांची सुद्धा चाचणी करणे गरजेचे आहे असे शहा यंनी मागणी केली आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, नवाब मलिक आणि विश्वजित कदम यांच्याकडे सुद्धा ही मागणी केली गेली आहे.(मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतर केले जाणार, वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेचा निर्णय)

सध्या कोरोनाचा राज्यातील वाढता आकडा पाहता लॉकडाऊन करण्याचा बद्दल विचार केला जात आहे. तसेच देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे. दरम्यान, महाराष्ट्राने आज (11 एप्रिल) विक्रमी नोंद केली आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 38 हजार 421 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.(Jumbo COVID-19 Center in Mumbai: मुंबईत 5300 बेड आणि 800 आयसीयू बेड असलेले जम्बो कोव्हीड सेंटर उभारले जाणार)

महाराष्ट्रात तब्बल 63 हजार 294 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 8 कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 27 लाख 82 हजार 161 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 5 लाख 65 हजार 587 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.65% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.