COVID-19 Hospital (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहेत. मुंबईत दररोज वाढणारा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईत आणखी 4 मोठे कोव्हीड सेंटर (Jumbo COVID19 Center) उभारले जाणार आहेत. याबाबत मुंबई महापालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माहिती दिली आहे. मुंबईत 5 हजार 300 बेड तर, 800 आयसीयू बेड असलेले कोव्हीड सेंटर उभारले जाणार आहेत. हे कोव्हिड सेंटर म्हाडा, सीडको, बीएमसी यांच्याअंतर्गत उभारले जाणार आहेत.

हे जम्बो कोव्हीड सेंटर कांजूरमार्ग, मालाड, सोमय्या ग्राऊंड आणि महालक्ष्मी येथे उभारले जाणार आहे. कांजूरमार्ग येथील कोव्हीड सेंटरमध्ये 2 हजार बेड आणि 200 आयसीयू बेड असणार आहेत. हे कोव्हिड सेंटर म्हाडाद्वारे बांधण्यात येईल. तर, सीडको अंतर्गत मालाड येथे 2 हजार बेड आणि 200 आयसीयू बेड उभारले जाणार आहेत. तसेच सोमय्या ग्राउंडवर म्हाडाच्या माध्यमातून कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये 1 हजार बेड आणि 200 आयसीयू बेड असणार आहेत. महालक्ष्मी येथील कोव्हीड सेंटरमध्ये 300 बेड आणि 200 आयसीयू बेड उभारण्यात येणार आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Mumbai Update: मुंबईत कोरोनाचे आणखी 9989 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 8554 जणांना डिस्चार्ज दिल्याची महापालिकेची माहिती

दरम्यान, महाराष्ट्रात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही रेमडेसीवीर इन्जेक्शन मिळत नाहीत. परंतु, गुजरात येथील भाजप कार्यालयात रेमडेसीवीर मोफत वाटली जात आहे. मुंबईत वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता शहरात लवकरच 5 हजाराहूंन अधिक बेड आणि आयसीयू बेड, आणि व्हेटीलेटरची सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्मल शेख यांनी दिली आहे.