शरद पवार अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात उद्या दुपारी दोन वाजता उपस्थित राहणार, अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करणार
NCP President Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Cooperative Bank Scam Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्या (शुक्रवार, 26 सप्टेंबर 2019) अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयात उपस्थित राहात आहेत. शरद पवार यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे.' दरम्यान, शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अवाहन केले आहे की, 'सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी'.

शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालय कार्यालय परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात नाव आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी आपण स्वत:च अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी स्वत: चर्चा करणार आहोत. तसेच, ईडी कार्यालयाचा पाहुणचार स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार ट्विट

या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी म्हटले होते की, 'ईडीने माझ्यासंदर्भात शिखर बँक प्रकरणात जो गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात मी माझी स्वतःची भूमिका अशी आहे की मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार. नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतलं पाहिजे', असंही शरद पवार यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Maharashtra Cooperative Bank Scam Case: येत्या 27 सप्टेंबरला अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात उपस्थित राहणार: शरद पवार)

शरद पवार ट्विट

पुढे बोलताना शरद पवार या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, 'आजवर आपण दिल्लीच्या तख्तासमोर कधीच झुकलो नाही. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचे संस्कार आमच्यावर झाले नाहीत. त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर आपण कधीच झुकलो नाही', असेही शरद पवार यांनी म्हटले होते.