CM Relief Fund on One Missed Call: मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे? फक्त एक मिस्डकॉल द्या! राज्य सरकारचा निर्णय, जाणून घ्या प्रक्रिया
CM Eknath Shinde | (Image Credits - Twitter)

Maharashtra Cm Relief Fund For Health Issue: मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तुम्हाला जर काही मदत मिळवायची असेल तर आता फार धावाधाव करण्याची आवश्यकता नाही. आता तुम्हाला केवळ एक मिस्डकॉल (Missed Call For Cm Relief Fund) देऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणारी मदत (Process For Cm Relief Fund) प्राप्त करता येणार आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गरजूंना मदत मिळविण्यासाठी 8650567567 या मोबाईल क्रमांकावर (Cm Relief Fund Mobile Number एक मिस्कडकॉल द्यावा लागणार आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल प्राप्त होताच गरजूंना त्यांच्या मोबाईलवर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज उपलब्ध करुन दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कानाकोपऱ्यातील नागरिकांना महत्त्वाची मदत होणार आहे. इतकेच नव्हे तर, गरजू नागरिकांना कागदांचे भेंडोळे घेऊन सरकारी कचेऱ्यांमध्ये हेलपाटेही मारावे लागणार नाहीत.

मुख्यमंत्री सहायता निधी कोणासाठी?

मुख्यमंत्री सहायता निधी हा प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दुर्धर आजारांवर उपचार घेणारे आणि ज्यांना वैद्यकीय उपचारांचा खर्च पेलवत नाही असे रुग्ण, यांशिवाय महागड्या शस्त्रक्रिया आणि दुर्धर आजारांसाठी मुख्यमंत्री सरहायता निधीतून मदत केली जाते. (हेही वाचा, HIV via Blood Transfusion: महाराष्ट्रात रक्ताद्वारे एचआयव्ही संक्रमणामध्ये तब्बल चार पट वाढ; पहा धक्कादायक आकडेवारी)

मिस्कडकॉलचा उपक्रम का?

मुख्यमंत्री सहायता निधी मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा, तो कोणत्या कार्यालयात मिळतो, हा अर्ज कोणाच्या नावे करावा, हा निधी नेमका कोणासाठी आहे, यांसह एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात. अशा वेळी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने आता नवा उपक्रम जाहीर केला आहे. ज्यामध्ये केवळ एका मिस्डकॉलच्या माध्यमातून नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी मिळवता येणार आहे. त्याचसाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे कक्षाकडून सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कसा प्राप्त करावा?

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी इच्छुकांनी 8650567567 या मोबाईल क्रमांकावर एक मिस्डकॉल द्यायचा आहे. हा मिस्डकॉल प्राप्त होताच संबंधितांच्या मोबाईलवर या निधीसाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाची एक लिंक एसएमएसद्वारे प्राप्त होईल. त्यावर क्लिक करताच हा अर्ज डाऊनलोड होईल. ज्याची प्रिंट काढून भरायचा आहे. त्यानंतर हा अर्ज आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे भरुन ती पोस्टाद्वारे अथवा स्कॅन करुन पीडिएफ रुपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवायची आहेत.

उल्लखनिय असे की, मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे येणारे सर्वधिक अर्ज हे कर्करोगावरील उपचारासाठी आहेत. त्यानंतर हृदयविकार, अपघात, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, डायलिसिसी, किडनी विकार आंदींसाठीही या निधीसाठी अर्ज करता येतात.