Uddhav Thackeray On Maharashtra Budget 2023: 'हसवा फसवी', 'गाजर हलवा' बजेट; Aaditya Thackeray, उद्धव ठाकरे यांचे अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र
Uddhav Thackeray | (Photo Credit: ANI)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट), भाजप सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्प 2023 (Maharashtra Budget 2023) वर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले. राज्याचे माजी मुख्यमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे गटाचे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray यांनी या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ 'गाजर हलवा' प्रकार आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तर आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाची संभावना 'हसवा फसवी' अशी केली.

उद्धव ठाकरे यांनीही म्हटले की, विद्यमान सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात नवे असे काहीच नव्हते. आगोदरच्या सरकारने जाहीर केलेल्या येजनाच नावात बदल करुन रेटण्यात आले. हा केवळ मधाचे बोट लावण्याचा प्रकार आहे. कोणतेही विशेष ध्येयधोरण नसलेला. प्रामुख्याने शेतकरी आणि नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त लोकांन कोणताही दिलासा न देणारा असाअर्थसंकल्प आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प केवळ गाजर हलवा प्रकार असल्याची खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्प पूर्ण वाचून पुन्हा एकदा सविस्तर प्रतिक्रिया देण्यात येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  (हेही वाचा, Maharashtra Budget 2023 Highlights: महाराष्ट्र अर्थसंकल्प, एक रुपयात पीक विमा, नैसर्गिक शेतीला प्राधान्य, महाकृषी विकास अभियानासह शेतकऱ्यांना काय मिळाले?)

आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, हे बजेट म्हणजे केवळ हसवाफसवीआहे. या बजेटमधून शेतकऱ्यांना तर काही मिळालेच नाही. पण, मुंबईलाही काही मिळाले नाही. मुंबईबद्दल या सरकारला इतका द्वेश का आहे? असा सवाल उपस्थित करत जे लोक महाराष्ट्राशी गद्दारी करतात. आरे जंगलातील झाडे कापतात. ते लोक पर्यावरणावर बोलतात म्हणजे विनोदच आहे. जे लोक प्रत्यक्षात गद्दारी करतात, खोटारडेपणा करतात. तेच लोक महापुरुषांच्या नावे घोषणा करतात, हा विरोधाभास असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.