महाराष्ट्रात दहावी,बारावी चे निकाल जाहीर केल्यानंतर बोर्डाकडून आता एसएससी (SSC) आणि एचएससी (HSC) च्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षांसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक (Supplementary Exam) देखील जाहीर करण्यात आले आहे. राज्यात कोरोना संकटामुळे बोर्डाने मागील परीक्षा रद्द करून केवळ अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने निकाल लावला होता. हा निकाल यंदा उशिराने लागल्याने आता पुरवणी परीक्षांच्या तारखा देखील पुढे गेल्या आहेत. यंदा अंंतर्गत मूल्यमापन पद्धतीमुळे लावण्यात आलेल्या निकालामध्ये मागील काही वर्षांचे मार्क्स ग्राह्य धरले गेले आहेत. त्यामुळे त्या फॉर्म्युल्याने मिळालेल्या मार्कांनी नाखूष असणार्यांना श्रेणीसुधारासाठी परीक्षा देता येणार आहे.
दहावी, बारावीचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी त्यांचे अर्ज ऑनलाईन सादर करू शकणार आहेत. याकरिता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट https://www.mahahsscboard.in/ वर सोय करण्यात आली आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.
माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत पुनर्परीक्षार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of credit घेणारे विद्यार्थी) तसेच तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी नियमित शुल्कासह 11 ते 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. तर लेट फी भरून विद्यार्थ्यांना 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. FYJC Admissions: अकरावी सीईटी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी करता येणार मोफत रजिस्ट्रेशन.
माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज यांना 23-24ऑगस्ट दरम्यान बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरायचा आहे. तर 25 ऑगस्टपर्यंत विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करायच्या आहेत.