Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

दहावी-बारावीच्या निकालानंतर आता कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला एकीकडे सुरूवात झाल्यानंतर ज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षेची ( Supplementary Exam 2023 ) देखील तयारी पूर्ण झाली आहे. पुरवणी परीक्षेची अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 9 विभागीय मंडळामध्ये होणारी ही परीक्षा जुलै- ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. दहावी,बारावीच्या पुरवणी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक बोर्डाने अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर जाहीर करण्यात आले आहे.

12 वी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 8 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा मंगळवार 18 जूलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत होईल. तर इयत्ता 10 वी लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023 या कालावधीत होईल. या तिन्ही कोर्सचं सविस्तर वेळापत्रक तारीख आणि वेळेनुसार तुम्ही ऑनलाईन पाहू शकता.

इथे पहा 10वीचं वेळापत्रक.

इथे पहा 12वीचं वेळापत्रक.

इथे पहा व्यवसाय अभ्यासक्रम वेळापत्रक.

10 वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023 व इ. 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आल्याचंही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान बोर्डाच्या वेबसाईट वरील हे संभाव्य वेळापत्रक केवळ माहितीसाठी देण्यात आल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जावं असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.