SSC Results 2019 (Photo Credits: Pixabay)

MSBSHSE 10th Std Results 2019 Date:  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावी निकालाचे वेध लागले होते. मात्र आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज (8 जून) रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाईट्सवर अतिताण आल्याने वेबसाईट्स हॅंग होतात. अशवेळी विद्यार्थ्यांची निराशा टाळण्यासाठी मोबाईलवर निकाल पाहण्याची सोय मंडळाकडून करण्यात आली आहे. तर एसएमएसच्या (SMS) माध्यमातून तुम्हांला निकाल पहायचा असेल तर काय कराल? (कसा पहाल Online Result?)

विद्यार्थी या वेबसाईट्सवर देखील आपला निकाल पाहू शकतात-

www.maharesult.nic.in,

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

तसंच BSNL युजर्स एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल पाहू शकतात.

SMS च्या माध्यमातून निकाल कसा पहाल?

एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहण्यासाठी MHSSCand लिहून हा  शॉर्टकोड 57766 वर पाठवा.