MSBSHSE 10th Std Results 2019 Date: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज (8 जून) रोजी जाहीर होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थींसह पालकही निकालाची वाट पाहत होते. काल मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 8 जून रोजी दुपारी एक वाजता हा निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना हा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट्स:
exametc.com
examresults.net
indiaresults.com
निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी काही सोप्या स्टेप्स:
# महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
# Latest Notification section खालील MAH SSC 2019 Result या लिंकवर क्लिक करा.
रिल्झट लॉग इन पेज ओपन होईल.
# त्यानंतर हॉल तिकीट नंबर, जन्मतारीख, आईचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरुन समिट बटणावर क्लिक करा.
# निकाल स्क्रिनवर दिसेल.
# तसंच तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता किंवा निकालची प्रत सेव्ह करु शकता.
राज्यात यंदा 17 लाख 813 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यात एकूण 4 हजार 874 परीक्षा केंद्रांवर 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत दहावीची परिक्षा पार पडली.