SSC-HSC Exams Result Marathi News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेत असलेली इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात महत्त्वाचा टप्पा मानली जाते. यंदा तर ही परीक्षा साधारण 10 ते 15 दिवस आगोदरच घेतली जात आहे. त्यामुळे निकालही लवकर लागणार की नेहमीप्रमाणे त्यात संभ्रम राहणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाने यंदा परीक्षा धोरण आणि निकालांवर लक्ष (Maharashtra Board HSC Result 2025 Date) केंद्रीत केले आहे. त्यामुळे यंदा इयत्ता दहावी, बारीवी परीक्षांचे निकाल येत्या 15 मे पर्यंत लागणार आहेत. खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीच त्याबाबत सुतोवाच केले आहे.
कॉपीमुक्त परीक्षा धोरण
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यांनी पुणे येथे शिक्षण विभागाच्या अखत्यारितील विषयांचा आढावा आढावा घेतला. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भुसे यांनी सांगिले की, यंदा इयत्ता दहवी, बारीवीच्या परीक्षा दहा ते पंधरा दिवस आगोदर होत आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून होत आहे. त्यामुळे यंदा परीक्षांचे निकालही लवकर लागतील. हे निकाल 15 मे पर्यंत लागणार असल्याचेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी सांगितले की, यंदा शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या परीक्षा अतिशय पारदर्शी आणि मोकळ्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी आम्ही कॉपीमुक्त परीक्षा धोरण अवलंबले आहे.
लाखो विद्यार्थी परीक्षार्थी
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या आणि फेब्रुवारी ते मार्च 2025 कालावधीत होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे 15,04,000 हजारांहून अधिक विद्यार्थी तर इयत्ता दहवीच्या परीक्षेसठी 16,10,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक व्यवस्था उपलब्ध करुन देणे ही आमच्या विभागाची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
माध्यम कणतेही असो, मराठी विषय बंधनकारक
राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत होते. राष्ट्रगितानंतर लगेच राज्यगीतही म्हटले जावे, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही दादा भुसे यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक करण्यात येणार आहे. या शिवाय शाळांच्या गुणवत्ता आणि भौतिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असा आराखडाही तयार करण्यात येत असून, त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असे भुसे यांनीसांगितले. राज्यामध्ये जवळपास एक लाखांहूनही अधिक शाळा आणि जवळपास दोन कोटी दहालाख विद्यार्थी आहेत. त्यासाठी जवळपास साडेसात लाख शिक्षक कार्यरत असल्याचेही भूसे म्हणाले.