
महाराष्ट्र बोर्डाकडून आज 12वीचा निकाल (Maharashtra Board HSC Result) जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्यात 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परंतू मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात बारावीचा निकाल 1.49% कमी लागला आहे. राज्य शिक्षण मंडळाने माहिती देताना हा निकाल कमी लागण्यामागे कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी कडक करण्यात आलेल्या कारवाईमुळे काहीसा परिणाम निकालावर झालासू शकतो असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान आता विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. 12वी बोर्डाचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर जाहीर केला जाणार आहे. त्याआधी जाणून घ्या यंदाच्या बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालामधील काही खास गोष्टी! नक्की वाचा: MSBSHSE 12th Results 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल SMS, digilocker.gov.in, DigiLocker App च्या माध्यमातून कसा पहाल?
12वी बोर्ड परीक्षा निकाल 2025 वैशिष्ट्यं
विभागनिहाय निकाल
पुणे - 91.32
नागपूर - 90.52 टक्के
संभाजी नगर - 92.24 टक्के
मुंबई - 92.93 टक्के
कोल्हापूर - 93.64 टक्के
अमरावती - 91.43 टक्के
नाशिक - 91. 31 टक्के
लातूर - 89.46 टक्के
कोकण - 96.74 टक्के
शाखेनुसार निकाल
विज्ञान- 97.35 टक्के
कला- 80.52 टक्के
वाणिज्य- 92.68
व्यवसाय अभ्यासक्रम- 83.03 टक्के
आयटीआय- 82.03 टक्के
यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे. राज्यात यंदा 100% गुण मिळालेला एकही विद्यार्थी नाही. पण, 1929 कॉलेजचा निकाल 100 % लागला आहे. नक्की वाचा: Maharashtra Board 12th Result 2025: बारावीचा निकाल 1 वाजता जाहीर होणार; पण निकालावर समाधानी नसाल तर गुणपडताळणी, श्रेणी, गुणसुधार, पुरवणी परीक्षेसाठी कसा कराल अर्ज?
महाराष्ट्रात यंदा 12वीची परीक्षा राज्यात 3373 केंद्रांवर झाली आहे. या 3373 पैकी 124 केंद्राची चौकशी होणार आहे. या केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने चौकशी होणार आहे. या चौकशी दरम्यान कोणत्या प्रकारची कॉपी होती हे पाहून दोषी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
2027-28 मध्ये बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार आहे त्यावेळी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याबाबत सरकार जसा निर्णय घेईल तसा बदल केला जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र सीबीएसई पॅटर्न लागू करतात राज्य मंडळाच्या अभ्यासाक्रमाचा देखील काही भाग त्यामध्ये राहणार आहे असे सांगण्यात आले आहे.