MSBSHSE 10th Std Results 2019: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज (8 जून) रोजी जाहीर करण्यात येईल. दुपारी 1 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. मात्र तत्पुर्वी शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत 16 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 12 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा राज्याचा 10 वीचा निकाल 77.10% लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात 12% ची घट झाली आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 82.82% लागला आहे तर मुलांचा निकाल 72.18% लागला आहे. राज्यातील विभागानुसार लागलेल्या निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला असून नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. (SMS च्या माध्यमातून असा पहा Result)
राज्यातील विभागानुसार दहावीच्या निकाल निकालाची टक्केवारी:
कोकण- 88.30%
मुंबई- 77.04%
पुणे- 82.48 %
औरंगाबाद- 75.20%
नागपूर- 37.87%
कोल्हापूर- 86.58%
नाशिक- 77.58%
लातूर- 72.67 %
अमरावती- 71.98%
आज दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहता येईल.
निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी काही सोप्या स्टेप्स:
# महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
# Latest Notification section खालील MAH SSC 2019 Result या लिंकवर क्लिक करा.
रिल्झट लॉग इन पेज ओपन होईल.
# त्यानंतर हॉल तिकीट नंबर, जन्मतारीख, आईचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरुन समिट बटणावर क्लिक करा.
# निकाल स्क्रिनवर दिसेल.
# तसंच तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता किंवा निकालची प्रत सेव्ह करु शकता.
राज्यात यंदा 17 लाख 813 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यात एकूण 4 हजार 874 परीक्षा केंद्रांवर 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत दहावीची परिक्षा पार पडली.
यंदा राज्याचा बारावीचा निकाल 85% लागला. यात मुलांचा 82.40% तर मुलींचा निकाल 90.25% लागला.