Chief Minister Uddhav Thackeray

Maharashtra Assembly Winter Session: मुंबईत पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी विविध मुद्द्यांवरुन विरोधकांवर निशाणा साधल्याचे दिसून आले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पुरातन मंदिराच्या संवर्धनासाठी स्वतंत्र्य निधी सरकारकडून दिला जाणार असल्याची ही घोषणा केली. त्यामुळे विरोधकांना कळून चुकले असे की, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही असे ही उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात म्हटले आहे.(Maharashtra Assembly Winter Session: 'कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा' अर्णब गोस्वामी, कंगना रनौत यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस आक्रमक)

प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धनासाठी दिला जाणाऱ्या निधीतून टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. अशा ऐतिहासिक वास्तूंचे जनत करण्यासह ते वाढवले ही जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.तसेच महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आपली ओळख आहे. त्याचसोबत हा प्रदेश साधुसंतांचा सुद्धा आहे. याच कारणास्तव प्राचीन वास्तूंचे जतन केले जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सभागृहात म्हटले. (CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही- मुंबई महानगरपालिका)

Tweet:

विधीमंडळाच्या सभागृहात उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मुद्द्यावर ही भाष्य केले. त्यांनी असे म्हटले की, मराठा आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आली आहे. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात ही टिकेल. परंतु मराठा समाजाला हक्क मिळवून देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पुढे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टिका करत असे म्हटले की, गेल्या 5 वर्षात कुंडल्या पाहणारे आता पुस्तक वाचत आहेत. त्याचसोबत केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हिवाळी अधिवेशन रद्द केले. पण राज्य सरकारने दोन दिवस तरी हिवाळी अधिवेशन बोलावले असे ही म्हणत हल्लाबोल केला आहे.