विधानसभा निवडणूक 2019: बंडोबांचे थंडोबा करण्यात सर्वपक्षीयांना अपयश; विदर्भात भाजप-शिवसेनेला अधिक फटका
BJP,Congress, Shiv Sena, NCP | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: युतीची औपचारीक घोषणा केल्यावर जागावाटपाचे सूत्र आणि उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी विलंब करुन संभाव्य बंडखोरी टाळण्याचा पूरेपूर प्रयत्न करुनही ती टाळण्यात भाजप (BJP) -शिवसेना (Shiv Sena) या दोन्ही पक्षांना अपयश आले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात अधिक मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून, बंडखोरीचा फटका भाजप, शिवसेना पक्षासह काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) अशा सर्वपक्षीयांनाच बसला आहे. विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा काल (7 ऑक्टोबर 2019) अखेरचा दिवस होता. विदर्भातील एकूण 62 जागांपैकी काही जागांहून बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र, 22 ठिकाणी मात्र बंडखोर उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. बंडखोरांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे.

मतदारसंघनिहाय पक्ष आणि बंडखोरांची नावे

भाजप

देशमुख (दिग्रस), आमदार राजू तोडसाम (आर्णी), सीमा सावळे (दर्यापूर), राजेश बकाणे (देवळी), आमदार चरण वाघमारे (तुमसर), विनोद अग्रवाल (गोंदिया), धनराज मुंगले (चिमूर), सुरेंद्रसिंह चंदेल (आरमोरी) यांनी भाजप उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे.

शिवसेना

विश्वास नांदेकर (वणी), संतोष ढवळे (यवतमाळ), डॉ. विश्वनाथ विनकरे (उमरखेड), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), किशोर कुमेरिया (दक्षिण नागपूर), अशोक शिंदे (हिंगणघाट), आशीष जयस्वाल (रामटेक) या प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवत पक्षाच्या आमदारांना आव्हान दिले आहे. (हेही वाचा, धुळे: भाजप, गिरीश महाजन यांना धक्का, अनिल गोटे आघाडीच्या गोटात, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर लढणार)

काँग्रेस

सेवक वाघाये (साकोली), रामरतनबापू राऊत (आमगाव), अनंतराव देशमुख (रिसोड)

राष्ट्रवादी काँग्रेस

दिलीप बनसोड (तिरोडा) यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

बंडखोरांची नावे आणि यादीवर लक्ष देता बंडखोरांना थंड करण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष नेतृत्वाला मोठे यश आले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षशिस्त आणि कारवाईचा इशारा देऊनही भाजपमधील बंडखोरी कायम राहीली आहे हे विशेष. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून शिस्तप्रियतेचा दावा नेहमीच केला जातो. मात्र, या वेळी पक्षशिस्त बाजूला ठेऊन अनेकांनी बंडखोरी केली आहे. दुसऱ्या बाजूला शवसेना पक्षातही काही वेगळी स्थिती नाही. मातोश्रीचा आदेश प्रमाण मानणाऱ्या शिवसेनेतही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे.