शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री होणार, उद्धव ठाकरे यांच्या विधानाने चर्चांना उधाण
Uddhav Thackeray, Shiv Sena party chief | (Photo Credit: File Photo)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Assembly Elections) येत्या 21 ऑक्टोंबरला पार पडणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात सुरु केली असून शिवसेना (Shiv Sena)-भाजप (BJP) पक्षात अन्य पक्षांच्या नेतेमंडळींची जोरदार इनकमिंग पहायला मिळाली. मात्र शिवसेना-भाजप युती बाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु होत्या. परंतु यावर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मोठे विधान देत युती कायम राहणार असल्याचे जाहीर केले. पण जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोणाचा होणार यावरुन आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

मुंबई येथील रंगशारदा सभागृहात शिवसेनेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक आज पार पडली. त्यावेळी विधानसभा निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांनी रणनिती काय असणार याबाबत सांगितले. याच बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असे विधान केले आहे. याबाबत आपण बाळासाहेबांना वचन सुद्धा दिले असल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच बाळासाहेबांना दिलेले हे वचन पूर्ण करणार असल्याची शपथ ही घेतली आहे.(Maharashtra Assembly Election 2019: शिवसेना- भाजपा युती जागावाटपाच्या तिढ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; 'भारत पाकिस्तान विभाजनापेक्षा 288 जागांचे वाटप करणं भयंकर')

शिवसेना-भाजप युतीसाठी सभागृहात उपस्थित असलेल्या तमाम शिवसैनिकांची साथ हवी आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच आपण सर्वजण शिवरायांचे मावळे असून आपल्याकडे कपट कारस्थाने कधीच केली जात नाहीत. त्याचसोबत विधानसभा निवडणूकीसाठी युतीकडून जोरदार तयारी केली जात असल्याचे सध्या दिसून येत आहे.

तर गेल्या दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या युतीच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राप्त माहितीनुसार भाजप 144 तर शिवसेना 126 जागांवर लढण्यास राजी झाली असून, उर्वरीत 18 जागा मित्रपक्षांना सोडल्या जाणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.