Maharashtra Assembly Election 2019: शिवसेना- भाजपा युती जागावाटपाच्या तिढ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; 'भारत पाकिस्तान विभाजनापेक्षा 288 जागांचे वाटप करणं भयंकर'
Sanjay Raut (Photo Credit : Twitter)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2019) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेनेने (Shiv Sena) एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यातच शिवसेनेचे खासदार, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपसंदर्भात विधान केले आहे. या विधानाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारत-पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यातील विभाजनापेक्षा निवडणुकीतील जागा वाटपाचा निर्णय कठीण आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात एकत्र निवडणूक लढवण्यासाठी युती झाली होती. परंतु, निवडणूकीच्या दरम्यान जागावाटपाला सहमती न मिळाल्यास दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. या विषयावर बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विभाजनापेक्षा युतीत जागा वाटपाचा निर्णय अधिक कठीण आहे. जर शिवसेना सत्तेत सामिल होण्याऐवजी विरोधात असते तर, आज परिस्थिती वेगळी असते. परंतु भाजप-शिवसेना यांच्यात काहीही निर्णय होईल, तो आपल्याला कळवला जाईल". हे देखील वाचा- Maharastra Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष 50 जागा लढणार, यापैंकी 8 उमेदवारांची केली घोषणा

ANI चे ट्वीट-

गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २88 पैकी 260 जागांवर उमेदवार उभे केले होते. तर शिवसेनेने 282 जागांवर निवडणूक लढविली होती. परंतु,निवडणुकीचा निकाल येताच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी 122 जागेवर विजय मिळवला होता. तसेच शिवसेनेचे 63 जागांवर आमदार विजयी झाले होते. लोकसभा 2014 निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेसोबत युती केली होती.