AAP (Photo Credit: File Photo)

निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शनिवारी 21 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Election 2019) ची तारीख जाहीर केली आहे. अगामी विधानसभा निवडणूक प्रकिया येत्या 21 ऑक्टोंबर रोजी पार पडणार आहे. तसेच 24 ऑक्टोंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या 50 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाने यापैकी 8 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्याचबरोबर मुंबईतून 3 जागा लढवणार असल्याची माहीती आपच्या नेत्या प्रीती शर्मा (Priti Sharma) यांनी दिली आहे.

प्रिती शर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षावरही जोरदार टिका केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष नाही. त्याचबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. अगामी विधानसभा निवडणुकीत आप पक्षाला घवघवीत यश मिळणार आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आप पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसेल, असा दावाही त्यांनी केला आहे. आम आदमी पार्टीचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती आपचे सचिव धनंजय शिंदे यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Assembly Elections 2019: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स

प्रिती शर्मा यांचे ट्विट-

महाराष्ट्र विधानसभा 2019 मध्ये आप पक्ष 50 जागा लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. आपच्या पहिल्या यादीतील 8 उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे:

1) विठ्ठल लाड (जोगेश्वरी पूर्व)

2) सिराज खान (चांदिवली)

3) दिलीप तावडे (दिंडोशी)

4) संदीप सोनावणे (पर्वती, पुणे)

5) पारोमिता गोस्वामी (ब्रम्हपुरी, चंद्रपूर)

6) आनंद गुरव (करवीर, कोल्हापूर)

7) विशाल वाडघुले (नांदगाव, नाशिक)

8) अभिजित मोरे (कोथरूड)

आप पक्षाचे ट्विट-

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पक्षाने बहुमताने विजय प्राप्त केला होता. यामुळे अगामी विधानसबा निवडणुकीत इतर राजकीय पक्ष आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहेत. परंतु कोणात्या पक्षाचे पारडे जड आहे? हे येत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच पाहता येणार आहे.