महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: नरेंद्र मोदी, अमित शहा, उद्धव ठाकरे यांचा प्रचारदौरा; पश्चिम महाराष्ट्र व पुणे सहित आजच्या सभांचे वेळापत्रक
Narendra Modi, Uddhav Thackrey And Amit Shah (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019) मतदानाला अवघा आठवडा शिल्लक असताना प्रचार सभा घेऊन नागरिकांना संबोधित करण्यासाठी दिग्गज मंडळी महाराष्ट्र दौरा करत आहेत. आजही,पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  हे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील सकोली (Sakoli)  व भंडारा (Bhandara) येथे तर अमित शहा (Amit Shah) कोल्हापूर (Kolhapur) , सातारा (Satara) , पुणे (Pune), औरंगाबाद (Aurangabad)  येथे सभा घेणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे औरंगाबाद, परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded) मध्ये नागरिकांशी संवाद साधतील.

आजच्या सभांविषयी माहिती देत मोदींनी एक ट्विट केले होते. प्राप्त माहितीनुसार, मोदी आज दुपारी 12 वाजता जळगाव मधील रॅलीने प्रचाराला सुरुवात करतील व त्यांनतर संध्याकाळी 4  वाजता भंडारा जिल्ह्यातील सकोली येथे त्यांची दुसरी सभा होणार आहे. येत्या 4  दिवसात राज्यभरात मोदी एकूण 9  प्रचारसभा घेणार असून त्यानंतर हरियाणा येथे देखील दौरा करणार आहेत.

नरेंद्र मोदी ट्विट

दुसरीकडे अमित शहा सकाळी 11 वाजल्यापासून प्रचार रॅलीला सुरुवात करतील, सर्वात आधी कोल्हापूर मध्ये तर त्यानंतर 1 वाजता सातारा जिल्ह्यातील कराड मध्ये, 3 वाजता पुण्यातील शिरूर येथे तर संध्याकाळी 6 वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर येथे शहा सभा घेणार आहेत. याआधी दसऱ्याच्या मुहूर्तावर शहा यांनी पंकजा मुंडे यांच्या समवेत बीड मध्ये सभा घेतली होती.

दरम्यान, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे सुद्धा आज महाराष्ट्रात 5 ठिकाणी सभा घेणार आहेत. 11 वाजता सिल्लौर येथून त्यांच्या सभा सुरु होती तसेच पाठोपाठ 12 वाजता परभणी मधील जिंतूर येथे तर 1 वाजता गंगाखेड येथे त्यांच्या दोन सभा होतील. यांनतर लगेचच 3  वाजता नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे तर 5 वाजता हिंगोली येथील कडमनोरी मधून ते नागरिकांची भेट घेणार आहेत.

यापूर्वी आदित्य ठाकरे आणि युवासेनेच्या वतीने महाआशीर्वाद यात्रेतून राज्यव्यापी दौरा करण्यात आला होता. तर भाजपाच्या महाजानदेश यात्रेतून मोदींनी नाशिक मध्य सभा घेतली होती, या दोन्ही पक्षांची युती असली तरी हे दोन्ही दौरे संयुक्त रित्या करण्यात आले होते.