Maharashtra Assembly Election 2019: 'तांत्रिक बिघाडामुळे चंद्रयान-2 चंद्रावर उतरु शकले नाही, परंतु अदित्य ठाकरे मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात नक्की पोहचणार'- संजय राऊत
Sanjay Raut (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ (Maharashtra Assembly Election 2019) तोंडावर आली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री पदाच्याबाबतीत मोठे विधान केले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे आकर्षित झाले आहे. तांत्रिक बिघाडामुळे चंद्रयान- २ चंद्रावर उतरु शकला नाही, परंतु शिवसेना पक्षाचे युवानेते अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मंत्रालयातील कार्यालयार पोहचणार, असे राऊत म्हणाले आहेत. अदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाली असून वरळी (Worli) येथील मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असणार, असा विश्वास शिवसेनेचे कार्यकर्ते दर्शवत आहेत. शिवसेना पक्षातील अनेक नेत्यांनी अदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनीही अदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात विधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संजय राऊत म्हणाले की, "काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चंद्रयान 2 चंद्रावर उतरू शकले नाही, परंतु आम्ही खात्री करुन घेऊ की हा सूर्य (आदित्य ठाकरे) 21 ऑक्टोबर रोजी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यापर्यंत पोहणार. अदित्य ठाकरेंच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार", असे ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Assembly Elections 2019: वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार; शिवसेनेच्या मेळाव्यात मोठी घोषणा

ANI चे ट्वीट-

आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ठाकरे घराण्यातील पहिले सदस्य असणार आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राजकारणाशिवाय मी काहीही करू शकत नाही, जनतेची परवानगी असेल मी निवडणूक लढवणार आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मी महाराष्ट्र पालथा घातला, राज्याला जाणून घेतले. ही यात्रा म्हणजे आजच्या निर्णयाची मोठी तयारी होती. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. मला जनतेची स्वप्ने साकार करायची आहेत, लोकांच्या न्याय हक्कांसाठी मला लढायचे आहे म्हणून मी हा निर्णय घेतला.’ अशा प्रकारे मोठ्या जोषात आदित्य ठाकरे यांनी आपले विचार स्पष्ट केले.