आदित्य ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) विधानसभा निवडणूक लढवणार याबाबत गेल्या काही आठवड्यांपासून चर्चा रंगत होती, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आज संध्याकाळी पार पडलेल्या शिवसेनच्या (Shiv Sena) विजय संकल्प मेळाव्यात स्वतः आदित्य ठाकरे यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत उमेदवारी जाहीर केली आहे  केली. आदित्य ठाकरे हे मुंबईच्या वरळी (Worli) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी,  ‘आपल्या समोर कुणीही उभे राहिले तरी चालेल, आपण लढणार आणि जिंकणार असे सांगत आदित्य यांनी सभेला संबोधित केले.

आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ठाकरे घराण्यातील पहिले सदस्य असणार आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राजकारणाशिवाय मी काहीही करू शकत नाही, जनतेची परवानगी असेल मी निवडणूक लढवणार आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मी महाराष्ट्र पालथा घातला, राज्याला जाणून घेतले. ही यात्रा म्हणजे आजच्या निर्णयाची मोठी तयारी होती. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. मला जनतेची स्वप्ने साकार करायची आहेत, लोकांच्या न्याय हक्कांसाठी मला लढायचे आहे म्हणून मी हा निर्णय घेतला.’ अशा प्रकारे मोठ्या जोषात आदित्य ठाकरे यांनी आपले विचार स्पष्ट केले. (हेही वाचा: 'तांत्रिक बिघाडामुळे चंद्रयान-2 चंद्रावर उतरु शकले नाही, परंतु अदित्य ठाकरे मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात नक्की पोहचणार'- संजय राऊत)

आदित्य ठाकरे यांच्या शोषणेनंतर शिव सैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचे दिसून आले. प्रत्येक शिवसैनिक या क्षणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होता. त्यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असे व्यक्त्यव्य केले. दरम्यान अजून शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. जागा वाटपाबाबत अजूनही दोन्ही पक्षांमध्ये चर्चा चालू आहे. यात आता आदित्य ठाकरे रिंगणात उतरल्याने शिवसेंची ताकद वाढली आहे.