
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2019) अवघे काहीच तास शिल्ल्क राहिले आहेत. यातच भाजप- राष्ट्रवादी (BJP-NCP) ऐकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ला करत आहे. राज्यातील निवडणुकीच्या आखाड्यात पैलवान कोण? यावरुन दोन्ही पक्षात चांगलेच राजकारण पेटले आहे. 'तेल लावलेला पैलवान तयार आहे, पण लढायला कोणी तयार नाही असे विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान केले होते. या विधानामुळे देवेंद्र फडणवीस हे टिकेचे धनी ठरले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यावर भाजपने प्रतिक्रिया देत सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाने त्यांच्या पक्षाचा प्रचार करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षावर जोरदार टिका केली आहे. 'तेल लावलेला पैलवान तयार आहे, पण समोर लढायला कोणीच तयार नाही', असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला खडेबोल सुनावले होते. यानंतर भाजपने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यामातून विरोधकांवर शाब्दिक वार करायला सुरुवात केली आहे. भाजपने विरोधी पक्षांवर निशाणा साधण्यासाठी रम्या नावाचे पात्र समोर आणले आहे. यातून रम्या विरोधकांचा समाचार घेत असल्याचे दिसते आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मतदान दिवशी Photo voter slips नव्हे तर PAN Card, Aadhaar Card सह ही '11' ओळखापत्र ग्राह्य ठरणार!
भाजपचे ट्विट-
रम्या म्हणतो, संपूर्ण महाराष्ट्रात धोबीपछाड देणारा आता एकच पैलवान उरला आहे!!#रम्याचेडोस pic.twitter.com/MMQA5N4Oga
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 18, 2019
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रकिया येत्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले होते. विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये कोणता पक्षाचा झेंडा रवला जाणार याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे.