वातावरण बदलाचे (Climate change) फटके अवघ्या जगाला बसत आहे. भारत तरी अपवाद कसा असणार. पाठिमागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचेच ऋतुमान बदलले असून, ऋतुंचे एक नवेच मिश्रण पाहायला मिळत आहे. त्यामुळे कधी उन्हाळ्यात पाऊस तर कधी पावसाळ्यात निरभ्र आकाश आणि उन्हाचा कडाका पायायला मिळतो आहे. काही ठिकाणी अवेळी थंडी (Cold Weather) आणि थंडीतही पाऊस पडतो आहे. सद्या असेच वातावरण देशातील अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. सध्या हिवाळा सुरु आहे. त्यामुळे वातावरणात गारठा वाढणार हे सहाजिकच. परंतू, काई ठिकाणी थंडीत पाऊस पडतो आहे. त्यामुळे कुठे पावसाचा शिडकावा तर कुठे गारठा असे वातावरण पाहायला मिळते आहे.
सध्या उत्तर भारतासह महाराष्ट्रातही थंडीचा कडाका जाणवत आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या असून लोकरीच्या कपड्यांनी बाजारपेठ भरुन गेली आहे. अनेक ठिकाणी तापमान (Temperature) 15 ते 20 अंशाच्य आसपास आहे. स्कायमेटने (Skymet) वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 24 तास उत्तर भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
थंडीत पावसाची हजेरी
दरम्यान, एकीकडे उत्तर भारतात थंडीचा कडाका जाणवत असला तरी दुसऱ्या बाजूला तामिळनाडू, दक्षिण किनारपट्टी, आंध्र प्रदेश, पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेश आदी राज्यांच्या काही भागांमध्ये पावसानेही हजेरी लावली आहे. त्यामुळे देशातील वातावरणच काहीसे विचित्र होऊन बसले आहे. महाराष्ट्राचे शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकात आणि , केरळ, नागालँड या राज्यांमध्येही हलका पाऊस झाला आहे. इशान्य भारतातही पाऊसाचा शिडकाव होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे.
स्कायमेट सांगते की, थंडी आणि पावसांमध्ये काही प्रदेशांमध्ये दाट धुकेही पाहायला मिळू शकते. प्रामुख्याने पुढच्या 24 तासांमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा काही भाग दाट धुक्याने अच्छादलेला पाहायला मिळू शकतो.
महाराष्ट्राची स्थिती काय?
महाराष्ट्रातही तापमानात घट झाली आहे. असे असले तरी वातावरणात संमिश्र बदल जाणवत आहेत. राज्यातील काही भागांमध्ये 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जाली. उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) सर्वाधिक कमी तापमान पाहायला मिळत आरेर. मराठवाड्यातही थंडी वाढली आहे. मुंबईकरांनाही चांगलाच गारवा अनुभवायला मिळतो आहे. नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये तापमान घटन्याचा वेग वाढला आहे. रब्बी पिकांसाठी ही थंडी चांगली राहील असा कयास आहे.